आता खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. या निवडणुकीत नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अशातच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. यामुळे राजकारण चांगलच तापणार असल्याच बोललं जातं आहे.
याबद्दल माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील,’ असं रोखठोक मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे आता शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याच चित्र निर्माण झालं आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
मात्र ‘खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आणि असं न झाल्यास आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘आमचं मतदान भाजपला जाणार नाही, मात्र आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु,’ असं बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यामुळे आता ठाकरे सरकार बच्चू कडू यांची मागणी पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बच्चू कडू यांनी यांनोख्या पद्धतीने ठाकरे सरकारची गोची केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते; ‘या’ नेत्याने मोदी सरकारचा खरा चेहरा आणला समोर
बायको आणि मुलीसमोर अभिषेक बच्चन दमेपर्यंत नाच नाच नाचला; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं कौतूक
विखे पाटलांचे नाक कापले! स्वत:च्या गावातच विरोधकांनी उडवला धुव्वा; १३/० ने केला सुपडा साफ
RCB कडून खेळताना 4 सामन्यांत बनवले 18 रन, इंग्लंडमध्ये जाताच पाडला धावांचा पाऊस