Share

bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…

bachchu kadu ravi rana

bachchu kadu warning ravi rana  | राज्यात गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्च कडू यांच्यात वाद सुरु होता. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाण्यासाठी पैसे घेतले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू देखील त्यांच्यावर आक्रमक झाले होते.

बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत घेतली होती. तसेच आरोप सिद्ध करुन दाखवा नाही, तर आम्ही निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं, असेही बच्चू कडू म्हणाले होते.

त्यानंतर या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली होती. तसेच आपल्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले होते, असे फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद आता मिटताना दिसून येत आहे.

वर्षावर एक बैठक झाली होती. त्यामध्ये या दोन्ही आमदारांचा वाद मिटवण्यात आला आहे. तसेच राणा यांनी आपले शब्दही मागे घेतले आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी जाहीर बैठक घेतली आहे. तसेच या बैठकीत त्यांनी रवी राणा यांना थेट इशाराच दिला आहे.

या पुढे वाट्याला गेल्यास पुन्हा माफ करणार नाही. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणा यांनी माफी मागितल्यामुळे बच्चू कडू यांनी आनंदही व्यक्त केला आहे. तसेच रवी राणांनी २ पावले मागे घेतली तर मी ४ घेईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू स्वत: ३५० गुन्हे घेऊन लढतोय. बाकी नेत्यासारखं कार्यकर्त्यांना लढ म्हणत नाही. आजचे हे शक्ती प्रदर्शन नाही. आम्ही सैनिकासारखे जगतो. गर्दीत दर्दी महत्वाचे आहे. सगळे दर्दी असल्याने बच्चू कडू ४ वेळा निवडूण येतो, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
KL Rahul : खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहूलची संघातून होणार हकालपट्टी? द्रविड म्हणाला…
T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा
World Cup: पंत की कार्तिक, उद्या बांग्लादेशविरूद्ध कोण खेळणार? राहुल द्रविडच्या उत्तराने सगळेच झाले अवाक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now