Bachchu kadu shocking statemet on amit shaha and devendra fadanvis | गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू यांना प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात, त्यांनी बंडखोरी करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत रवी राणा यांना सुनावले आहे.
५० आमदारांना खोरे दिले का? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे ५० आमदार नाराज झाले असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
रवी राणा यांच्या आरोपांमुळे मीच नाही, तर ५० आमदार नाराज झाले आहे. अनेकांनी मला फोन करुन याबाबत भूमिका मांडली होती. राणा यांचे हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
रवी राणा हे आपण देवेंद्र फडणवीस, अमित शाह, यांच्या जवळचे असल्याचे सांगत आहे. त्यामुळे यामागे कोणाची फुस नाही ना अशी शंका यायला लागली आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं, असेही बच्चू यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पुर्णपणे विश्वास आहे. ते मला योग्य ते न्याय देतील. माझ्या मागणीवर १ तारखेपर्यंत विचार केला नाही, तर मी आणि माझ्यासोबत असलेले आमदार आमची भूमिका घेऊ, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तसेच सत्तेवर लाथ मारणारा माणूस असले आरोप सहन करणार नाही. मी स्वाभिमानी आहे. मी रवी राणा यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोप एकतर सिद्ध करावे नाही, तर माझी माफी मागावी, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
urvashi rautela : ऋषभ पंतचा पत्ताकट, साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात पडली उर्वशी रौतेला?
गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती, वाचा सविस्तर
‘साहेब..! माझं बाळ गायब झालंय,’ आईने पोलीस ठाण्यातच फोडला हंबरडा, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत…