राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचे विषय बनले आहे.
आता असाच एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आहे. भर बैठकीत बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला आहे. ‘फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला लाथच मारायला पाहिजे,’ अशा शब्दात बच्चू कडूंनी थेट अधिकाऱ्यांना झाप झाप झापले आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? काल बच्चू कडूंनी भुसावळ येथील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी बच्चू कडूंनी थेट अधिकाऱ्यांना झाप झाप झापले आहे. त्याच झालं असं, कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
मात्र बच्चू कडूंनी त्यासंदर्भात अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचं समजताच कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांना झापले. कडू अधिकाऱ्यांना म्हणाले, “फुकटचा पैसा खायला पाहिजेलाज वाटली पाहिजे थोडी. तुम्हाला लाथच मारायला पाहिजे. किमान ३५ हजारापैकी १० हजाराचं तर काम करा. रोजगार हमी सांगतो, नालायका…!.”
पुढे कडू म्हणाले, ‘गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही. तो मेला तरी चालेल. नको होऊ दे १० वर्ष घर. तुमची काहीच तयारी नाही. कोणत्या वर्षात योजना सुरू केली तुम्ही?” असे सवाल बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला विचारले. याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, कामात कसूर करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बच्चू कडू यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. रमाई योजना, पंतप्रधान योजनेतून कोणतीही विकास कामे न केल्याने बच्चू कडू यांनी 8 दिवसात अहवाल मागवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर संभाजीराजेंचाही गौप्यस्फोट; म्हणाले, शिवरायांना स्मरून सांगतो…
VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव
…त्यामुळे सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली; मनसेने सांगितला इतिहास