Share

bachchu kadu : ..तर मी नवनीत राणांच्या घरी भांडी घासेल; बच्चू कडूंची मोठी घोषणा

bachchu kadu : राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकारमध्येच वादाची ठिणगी पडली असल्याच आता पाहायला मिळत आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा आणि शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

रवी राणा आणि शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणांच्या आरोपांवर कडू यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. यामुळे सध्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच कडू यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

माध्यमांशी बोलताना कडू यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. काही दिवसांपूर्वीच रवी राणा यांनी बच्चू कडूंवर आरोप करताना म्हंटलं होतं की, गुहाहाटीला जाऊन कोट्यावधी रूपये कडूंनी लाटले. कडू यांनी विधान परिषद आणि राज्यसभेसाठी पैसे घेतल्याचा आरोपही राणा यांनी केला.

यावर आता बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी जर खोके घेतले असेन तर त्याचे पुरावे देण्यात यावे. मी खोके घेतले का? हे शिंदे-फडणविसांनी सांगावे, असे खुलं आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे. यामुळे आता रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखीनच टोकाला गेल्याच पहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘राणांनी आपल्यावर तोडपाणीचे आरोप केलेत, या आरोपाचे एक तारखेपर्यंत पुरावे मला द्या. पुरावे दिले तर मी राणांच्या घरी भांडी घासीन, असे बच्चू कडू स्पष्टच बोलताना म्हणाले आहेत. तसेच ‘राणांनी आता लढायला तयार राहावं. जिथे म्हणाल, तिथे मी एकटा यायला तयार असल्याच देखील कडू यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now