काही दिवसांपूर्वी अकोल्यात वंचितचे उपाध्यक्ष पुंडकर यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयात भ्रष्ट्राचाराची तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रस्तावात बदल करून मंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४०५, ४२०(फसवणूक), ४६८(खोटे कागदपत्रे तयार करणे), ४७१(खोट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर (Dhairyavardhan Pundkar) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शिरेंद्रन पुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात अनोख्या पध्दतीने उत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांनी आज अकोल्यात 45 डिग्री तापमानात श्रमदान करून विरोधकांना उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ‘ही तक्रार खोटी असल्याचा आरोप कडू यांनी केला.
तसेच आपल्या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना पुन्हा एकदा कडू हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. माध्यमांशी बोलत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते म्हणतात, ‘जात आणि धर्माचे नाव सांगून आम्ही उभे झालेलो नाही, तर हे नेतृत्व उभे करण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. ‘
पुढे बोलताना कडू चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका खडकुचाही भ्रष्टाचार सिद्ध झाला तर ठीक, नाही तर ‘एक तो हम रहेंगे, नही तो तूम रहोगे XX…’, असा इशारा बच्चू कडू यांनी वंचित बहुजन विकास आघाडीला दिला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीला इशारा देताना कडू यांची जीभ देखील घसरली.
महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं ऐकणार की बेगडी शरद पवारांचं? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
उद्याच्या आंदोलनावर राज ठाकरे ठाम; देशातील सर्वसामान्य नागरीकांनी केली ‘ही’ तीन आवाहने
आता नाही तर कधीच नाही! उद्याच्या आंदोलनासाठी राज ठाकरेंनी देशातील हिंदूंना दिला ‘हा’ आदेश
पृथ्वी शॉ ने मुंबईत खरेदी केले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे अपार्टमेंट, वाचा असं काय खास आहे त्यात?