Share

‘तुमची इच्छा असेल, तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो, बच्चू कडू सर्वांचा बाप आहे’

bachchu kadu

राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचा विषय बनला आहे.

पुन्हा एकदा कडू यांनी रोखठोक विधान केले आहे. मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुमची ईच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो असे देखील यावेळी कडू म्हणाले. अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली.

यावेळी ते बोलत होते. गेल्या आठ दिवसापासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करत आहे. मात्र आठ दिवस उलटूनही उपोषणाची कोणी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे शेतकरी नेते असलेले व शेतकऱ्यांसाठी आक्रमक होणारे बच्चू कडू यांनीही या उपोषणाला पाठ फिरवली असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे थेट राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. यामुळे या उपोषणाला भरपावसात राज्यमंत्री कडू यांनी भेट दिली.

यावेळी बोलताना कडू यांनी ‘तुमची इच्छा असेल, तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो’, ‘मंत्री पदाची काही पर्वा नाही’, बच्चू कडू सर्वांचा बाप आहे, असे ते म्हणाले आहेत. ‘तुम्ही न्यायासाठी उपोषणाला बसला आहात की, माझ्या राजीनाम्यासाठी असा सवाल करत, मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कडू यांनी दिली. या बैठकीत आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या
मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे’
विराट कोहलीने नेहमी डावललं पण रोहित शर्मा ‘या’ स्टार खेळाडूला देणार संधी, एकाच ओव्हरमध्ये पलटतो मॅच
फोटोग्राफरचा एक क्लिक आणि ‘त्या’ मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदललं, वाचा फुगे विकणाऱ्या किसबूची कहाणी
IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now