bachchu kadu answer to ravi rana | गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू यांना प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात, त्यांनी बंडखोरी करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत रवी राणा यांना सुनावले आहे.
५० आमदारांना खोके दिले का? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे ५० आमदार नाराज झाले असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
रवी राणा यांच्या आरोपांमुळे मीच नाही, तर ५० आमदार नाराज झाले आहे. अनेकांनी मला फोन करुन याबाबत भूमिका मांडली होती. राणा यांचे हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
रवी राणा हे आपण देवेंद्र फडणवीस, अमित शाह, यांच्या जवळचे असल्याचे सांगत आहे. त्यामुळे यामागे कोणाची फुस नाही ना अशी शंका यायला लागली आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं, असेही बच्चू यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पुर्णपणे विश्वास आहे. ते मला योग्य ते न्याय देतील. माझ्या मागणीवर १ तारखेपर्यंत विचार केला नाही, तर मी आणि माझ्यासोबत असलेले आमदार आमची भूमिका घेऊ, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तसेच सत्तेवर लाथ मारणारा माणूस असले आरोप सहन करणार नाही. मी स्वाभिमानी आहे. मी रवी राणा यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोप एकतर सिद्ध करावे नाही, तर माझी माफी मागावी, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : विराट-सूर्यकुमार पुढे नेदरलँड्स पडले थंड, टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय
shivsena : ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे..! दिपाली सय्यदांच्या पुढील राजकीय भूमिकेचे संकेत रांगोळीतून दिसले
दिवाळीची सुट्टी अन् पगार देत नव्हता मालक, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकालासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य






