अभिनेता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘बच्चन पांडे’ हा 2014 मध्ये आलेल्या ‘जिगरथांडा’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्या चित्रपटात असॉल्ट सेतू नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारणाऱ्या बॉबी सिन्हाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमात अक्षय कुमारनंही तीच भूमिका साकारली आहे.
विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत इतर सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी, अॅक्शन, इमोशनने परिपूर्ण असलेल्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
तसेच अक्षय कुमार, क्रिती सनॉन, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. मात्र बॉक्स ऑफिसच्या कमाईत ‘द काश्मीर फाईल्स’चा त्याला फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’कडून या चित्रपटाला जोरदार टक्कर मिळते आहे. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी आशा व्यक्त केली जातं आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला. मात्र विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत आहे.
दरम्यान, हा सिनेमा पहिल्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकवर्ग ‘द कश्मीर फाइल्स’ला पसंती देत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी बच्चन पांडेची 13.25 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवसाचा हा आकडा चांगला जरी असला, तरी द कश्मीर फाइल्सपेक्षा अनपेक्षितपणे मात्र कमीच आहे.
तर दुसरीकडे ‘बच्चन पांडे’च्या ओपनिंगला स्टार्स आणि मेकर्सनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अर्शद वारसी चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. तसेच बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमारचा ‘अॅक्शन अवतार’ पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एमआयएमला सामिल करून घेणार?
“लवकरच आपला देश द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असेल”
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळेत देखील भगवद्गीता शिकवली जावी; भाजपने केली मागणी
बापाने डोक्यात मुसळी मारुन आईला संपवलं; पण ‘तो’ ना रडला ना हरला, शेवटी त्याने आयुष्य जिंकूनच दाखवलं