bacchu kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू हे आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. शिंदे गटात सामील झाल्यापासून बच्चू कडू हे नाराज असल्याच बोललं जातं आहे. याचे कारण असे की, शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाहीये. यामुळे ते शिंदे गटावर नाराज असल्याच बोललं जातं आहे.
काल त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. यामुळे पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहेत. कडू यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली असल्याच बोलल जातं आहे. मात्र असं असलं तरी, कडू यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे समर्थन केले आहे.
यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कडू यांनी म्हंटलं आहे की, ‘एकनाथ शिंदे साहेब म्हणायचे की, आमचे पन्नास आमदार पडू देणार नाही, पडण्याचा विषयचं नाही, कधी उभं राहणार, असा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, असं बच्चू कडू यांनी स्पष्टच म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते रवी राणा यांच्याकडून कडू यांच्यावर जोरदार टीका होत आहे. कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर कडू यांनी याविरोधात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली.
मात्र एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. हाच मुद्दा कडू यांना खटकल्याने बच्चू कडू आता राज्य सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाणार असल्याच बोललं जातं आहे. याबाबत कडू यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.
तर दुसरीकडे कडू यांनी उद्धव ठाकरेंचे समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय अतिशय चुकीचा होता, असे बच्चू कडू यांनी बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू आहे.
बच्चू कडू राज्य सरकारमधून बाहेर पडणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे कडू यांनी उद्धव ठाकरेंचे समर्थन केल्याने ते आता ठाकरे गटात जाणार का? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आता सर्वांचे लक्ष्य बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा