Share

गडकरी पंतप्रधान असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता; ठाकरे सरकारमधील बड्या नेत्याचे वक्तव्य

nitin gadkri

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या चोख कामासाठी ओळखले जातात. कित्येक वेळा विरोधक देखील गडकरी यांचे तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळतात. याउलट गडकरी देखील अनेकदा राज्य सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करतात.

तर आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. “गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता,” असं वक्तव्य कडू यांनी केल आहे. कडू यांनी केलेल्या या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वाचा नेमकं बच्चू कडू काय म्हणाले..? आजच बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना कडू यांनी भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. कडू यांनी भाजप नेत्याबद्दल केलेल्या या व्यक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटलं की, “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”, असं कडू स्पष्टच बोलले.

अशा पद्धतीने कडू यांनी यावेळी भाषणामध्ये बोलताना मोदी आणि गडकरी यांच्यातला फरक सांगितला आहे. ‘ज्यावेळी मोदींनी 100 रुपयांत गॅस वाटला त्यावेळी 400 रुपयांत सिलिंडर मिळत होते आणि आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली असल्याची जहरी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचा विषय बनला आहे. तर आता ते गडकरी यांचे कौतुक केल्यामुळे चर्चेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
यंदाच्या महापालिका निवडणूकीत भाजपलाच अच्छे दिन, शिवसेनेला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा
जीवनावश्यक वस्तू फक्त त्याच व्यवसायिकाकडूुन खरेदी करेल, जो हिंदू धर्माचा…; हिंदू महासंघाने घेतली शपथ
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now