ठाकरे सरकारची चारही बाजूंनी चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून ठाकरे सरकारला सतत धारेवर धरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सत्ताधारी नेत्यांच्या पाठीमागे ईडी हात धुवून लागली आहे. तर दुसरीकडेसरकार मधील नाराजीनाट्य थांबण्याच नाव घेत नाहीये.
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अपक्ष आमदार राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचे विषय बनले आहे.
आता बच्चू कडू यांनी स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर देतं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी देखील अनेकदा त्यांनी आपल्याच सरकरला घरचा आहेर दिला आहे. काय म्हणाले कडू वाचा सविस्तर..
“केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, मी मंत्री जरी असलो तरी शेतकऱ्यांसाठी फार समाधानी असल्याचे कडू यांनी सांगितले. त्याची खदखद केव्हाही बाहेर पडेल असे स्पष्ट शब्दात बच्चू कडू यांनी सांगितले. त्यामुळे कडू हे सरकारवर नाराज असल्याच्या चर्चाना वेग आला आहे.
परखड मत व्यक्त करत कडू यांनी महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे. याबाबत अकोल्यात एका कार्यक्रमादरम्यान बच्चू कडू बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कर्जमाफी किती झाली हे महत्त्वाचे नाही. कारण पाच वर्षात आपण ५० हजाराने शेतकऱ्यांना लुटतो आणि २० हजार रुपयांची कर्जमाफी देतो.’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच ही परीक्षा पारदर्शीपणे व्हावी यासाठी ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी अशी मागणी करत कडू यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला होता.