bacchu kadu : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेतील नेते मंडळी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील आपल्या आक्रमक स्वभावाने ओळखले जातात. अनेकदा कडू हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात.
अनेकदा कडू यांची विधान वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतं. व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली आहे.
या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एका कडू हे चांगलेच चर्चेत आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील ही घटना आहे.गावातील विकास कामाच्या मुद्यावरुन वाद झाला. तेव्हा ‘ऐकून घे आधी, शांत बस!’, असं म्हणत बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसत आहेत.
अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले.
कडू यांच्या मतदार संघातील गणोजा येथील सर्कल प्रमुख पदावर काम करणारे सौरभ इंगोले यांनी विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार केली. बच्चू कडू यांनी त्याला “तुला काय समजत”, असं म्हणत संतापले. तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.
दरम्यान, त्याचवेळी कार्यकर्त्यानेही कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं. त्यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असा दम दिला. धक्कादायक बाब म्हणजे, अशातच गावातील एका व्यक्तीने मध्ये हस्तक्षेप करत बोलण्याचा प्रयत्न केला असता कडूंनी त्याच्या कानशिलात लगावली.
महत्वाच्या बातम्या
Deepika padukone : हृदविकाराच्या आजारामुळे दिपीकाची प्रकृती चिंताजनक; मध्यरात्री ॲडमीट, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
Eknath Shinde : अखेर निर्णय झाला! एकनाथ शिंदे होणार नवे शिवसेना पक्षप्रमुख
Chhagan Bhujbal : शाळांमध्ये सरस्वती ऐवजी शाहु फुले आंबेडकारांचे फोटो लावा; छगन भुजबळांची जाहीर मागणी
Election Commission : शिवसेना नेमकी कोणाची? निवडणूक आयोगाने दिलं महत्वपूर्ण स्पष्टीकरण