bacchu kadu : ठाकरे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेले आपण पाहिले आहे. मात्र आता ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती.
मात्र तसं काहीच न घडल्याने ते नाराज असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. अशातच काल पत्रकार परिषद घेत कडू यांनी मोठं भाष्य केल आहे. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. काल पत्रकार परिषदेत राणा यांनी केलेले आरोप कडू यांनी फेटाळून लागले.
यावेळी बोलताना कडू यांनी म्हंटलं आहे की, ‘समर्थनासाठी खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
पुढे बोलताना कडू यांनी म्हंटलं आहे की, ‘एकनाथ शिंदे साहेब म्हणायचे की, आमचे पन्नास आमदार पडू देणार नाही, पडण्याचा विषयचं नाही, कधी उभं राहणार, असा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, असं बच्चू कडू यांनी स्पष्टच म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेदरम्यान, बच्चू कडू यांनी आक्रमकपणे म्हंटलं आहे की, आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्गणी मागायला गेलं की गावातली लोकं असं म्हणणार, ‘बरं तुम्ही तर पन्नास खोके घेतले’. आपल्या घरातील माणूस आरोप लावत असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे , असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, ‘आमच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. यामुळे आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचबरोबर बच्चू कडू आता काय राजकीय भूमिका घेणार? याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..