मागील काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ हा शो पूर्ण झाला. या शोचा हा १५ वा सीजन होता. प्रत्येक सीजन प्रमाणे या सीजनमध्ये ही भांडणं, वाद, ड्रामा पाहायला मिळाला. तसेच या सीजनची विजेती तेजस्वी प्रकाश झाली. तर प्रतीक सहजपाल हा उपविजेता झाला. त्याचबरोबर करण कुंद्रा हा टॉप ३ मध्ये होता. तसेच या सीजनमध्ये तेजस्वी आणि करणची जोडी खूप गाजली होती.
या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. ‘बिग बॉस’ च्या घरात या दोघांचे रिलेशनशिप सुरू झाले होते. तसेच हा शो जरी संपला असला तरी ही हे दोघे नेहमी चर्चेत असतात. या दोघेही आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहत्यांकडून देखील या जोडीला खूप प्रेम मिळते. या दोघांच्या बाँडींगमुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
तसेच हे दोघेही त्यांचे रोमँटिक क्षण सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. नुकताच करण कुंद्रा आपल्या आई-वडिलांसोबत तेजस्वीच्या घरी गेला होता. तिथूनच त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता या दोघांनी लग्ना अगोदरच मुलांचे प्लॅनिंग केले असल्याचे समजले आहे.
नुकत्याच माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत करण कुंद्राने त्याच्या आणि तेजस्वीच्या संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर करणने या दोघांच्या भविष्याच्या प्लॅनिंगबद्दल म्हणजेच बेबी प्लॅनिंगबद्दलही बरेच काही सांगितले आहे. याच दरम्यान करण म्हणाला की, “तेजस्वीला जवळजवळ २५ मुलं पाहिजे आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला एक मुलगी हवी आहे. तर तिला २५ मुलं हवी आहेत.” तसेच तो पुढे म्हणाला की, “माझा स्वत:वर विश्वास आहे की, मी एक चांगला पिता होऊ शकेल. माझे आणि माझ्या बहिणीच्या मुलांचे खूप चांगले बाँड आहे. मात्र त्यावेळी माझे वय थोडे कमी होते.” तसेच तो मुलीबद्दल बोलताना म्हणाला की, “मला मुलगी झाली आणि दोन-तीन खून झाले नाहीत तर माझे नाव बदला.”
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी ‘बिग बॉस १५’ च्या घरात बनली होती. हे दोघे अगोदर एकमेकांचे मित्र झाले. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तर सध्या तेजस्वी ‘नागिन’ ही मालिका करत आहे. तसेच करण आणि तेजस्वीचा नुकताच एक व्हिडिओ अल्बम आला होता. त्याला देखील चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.