Share

‘साहेब..! माझं बाळ गायब झालंय,’ आईने पोलीस ठाण्यातच फोडला हंबरडा, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत…

crime news

लहान मुलांच्या चोरीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे. 24 तासांच्या आत पोलिसांनी चोरीला गेलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत दिलं आहे. बाळ कुशीत येताच आईने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बाळ चोरीला जाताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. अखेर 24 तासांच्या आत पोलिसांनी बाळाचा शोध लावला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाचा नेमकं घडलं काय?
ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब झेव्हियर कॉलेजसमोरील सार्वजनिक शौचालयाजवळ फूटपाथवर राहत आहे.  २६ ऑक्टोबर रोजी त्यांची अडीच महिन्यांची  मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.

घाबरलेल्या कुटुंबीयांनी थेट आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठले. ‘साहेब माझं बाळ गायब झाल्याचे सांगत आईने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. आईचा आक्रोश पाहून पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवली. पोलिसांनी ८ पथके तयार करून स्थानिक, रेल्वे आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला.

पोलिसांनी डोंगरी पथकाने प्रथम घटनास्थळ गाठून मुलीला शोधून काढत आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार,  मोहम्मद हनिफ असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले की, टीमने दिवाळीच्या मुहूर्तावर सण बाजूला ठेवून बाळाला शोधून काढले. आईच्या ताब्यात दिले.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now