Share

मुंबई इंडियन्सच्या बेबी एबीची गर्लफ्रेंड आहे सोशल मिडीया सेंसेशन, दिसते खुपच सुंदर, पहा फोटो

बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स च्या सामन्यातून ज्यूनियर एबी डिविलियर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने आयपीएलमध्ये डेब्यू केला. या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने आपली छाप उमटवली. त्याच्या खेळाबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना आता त्याच्या लव्हस्टोरी बद्दल देखील तुफान चर्चा होताना दिसत आहे.

या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. डेवाल्ड ब्रेविसने पदार्पणाच्या सामन्यात 19 चेंडूत 29 धावा केल्या. ब्रेविसने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. त्यामुळे त्याची खेळी चांगली राहिली.

वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात सॅम बिलिंग्सने त्याचं स्टम्पिंग केलं. तो एबी डिविलियर्स म्हणून प्रसिद्ध आहे कारण, तो एबीडी विलियर्ससारखी बॅटिंग करतो. डेवाल्ड ब्रेविस जेवढा चर्चेत असतो, तेवढीच त्याची गर्लफ्रेंड देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

डेवाल्ड ब्रेविसच्या गर्लफ्रेंडचे नाव लिंडी मारी आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. ती मिडीया सेंसेशन आहे. हे दोघे एकमेकांना गेले चार वर्षांपासून डेट करत आहेत. दोघेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात.

डेवाल्ड ब्रेविसचा जन्म 29 एप्रिल 2003 रोजी जोहान्सबर्ग येथे झाला. ब्रेविसला एक मोठा भाऊ असून त्याचं नाव रेनार्ड ब्रेविस आहे. एबीडी विलियर्सने दोन वर्ष डेवाल्डला मार्गदर्शन केलं होतं. दोघांनी नेटमध्ये बराच वेळ एकत्र घालवला. त्यामुळे डेवाल्डच्या खेळात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असे म्हणतात.

18 वर्षाच्या डेवाल्ड ब्रेविसला मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 20 लाख बेस प्राइस असलेल्या डेवाल्डला विकत घेण्यासाठी सीएसके आणि पंजाब किंग्सने बोली लावली होती. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत डेवाल्डने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं होतं. ब्रेविसने सहा सामन्यात 84.33 च्या सरासरीने 506 धावा केल्या. त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत.

खेळ इतर

Join WhatsApp

Join Now