पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गुरुवारी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. काही नेते उमेदवारी मिळाल्यामुळे खुश देखील झाले आहेत. पण आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळून देखील आनंद साजरा करण्याची स्थिती राहिली नाही.(babush-monserat-cbi-court-hearing-start)
मोन्सेरात कुटुंबावर आलेली ही स्थिती उत्पल पर्रीकर यांनी केलेल्या बंडखोरीमुळे नाही, तर सीबीआय न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आजपासून सुरु होणाऱ्या खटल्यामुळे आली आहे. २००८ साली काही लोकांनी पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. त्या प्रकरणात बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि इतरांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले होते.
आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर ते रद्द करण्यात यावे अशा मागणी बाबूश मोन्सेरात यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात करण्यात आली होती. त्यावेळी गोवा खंडपीठाने त्यांना दिलासा देताना सुनावणी काही काळासाठी स्थगित केली होती. पण हा दिलासा फार काळ टिकला नाही. कारण गोवा खंडपीठाने तो अर्ज फेटाळला आहे आणि त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
हा खटला गोवा विधानसभा निवडणूकीसाठी बाबूश मोन्सेरात त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरु झाला आहे. म्हापसा येथील सीबीआय न्यायालयात हा खटला सुरु आहे. या खटल्यासाठी आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. २००८ सालच्या या प्रकरणात मोन्सेरात कुटूंबासह ३५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
त्यावेळी आमदार बाबूश मोन्सेरात काँग्रेस पक्षात होते. आज त्यांच्यावर खटला सुरु आहे तेव्हा ते भाजपमध्ये आहेत. बाबूश मोन्सेरात यांच्याबरोबर त्यांचे त्यावेळचे सहकारी माजी महापौर उदय मडकईकर आणि टोनी रौड्रिगीश हे ही त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या विरोधात देखील हा खटला चालणार आहे. पण आता ते काँग्रेस पक्षात आहेत आणि आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात निवडणुकीसाठी लढणार आहेत.
भाजपने आमदार बाबूश मोन्सेरात यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघात गोव्यातील भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण या मतदारसंघात भाजपने दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उत्पल पर्रिकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
राजनाथ सिंहांच्या मुलाला तिकीट पण मनोहर पर्रीकरांच्या मुलाला का नाही? काय आहे भाजपचा गेमप्लॅन?
“गोव्यात शिवसेनेला कोणी ओळखत नाही, त्यांच्या सर्व उमेदवारांना १००० मतं पण नाही मिळणार”
ज्या नवरा-बायकोसाठी फडणवीसांनी पर्रिकरांना डावललं, तेच आता पक्के अडकले; भाजपवर नामुष्की