Share

बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, संजय राऊतांनी थेट पुरावेच देत दिले फडणवीसांना आव्हान

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेवर बाबरी प्रकरणावरून खोचक टीका केली होती. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता बाबरी पाडण्यासाठी गेला नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वृत्तपत्रातील काही कात्रणाचे पुरावे देत फेसबुक पोस्ट टाकत प्रतिउत्तर दिलं आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बुस्टर सभेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. म्हणाले, मशिदीवरील भोंगे उतरवण्याची हिम्मत नाही आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली. बाबरी पाडल्यानंतर सर्व आरोपी हे भाजपचेच होते शिवसेनेचा एकही कार्यकर्ता बाबरी पाडण्यासाठी गेला नव्हता, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेवर लगावला होता.

फडणवीस यांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे एक कात्रण आणि अन्य काही वृत्तपत्रातील कात्रणं ट्वीट केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये आता बोला असे देखील लिहिले आहे. संजय राऊत यांच्या या पोस्टवर विरोधकांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी देखील फडणवीस यांना प्रतिउत्तर दिलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. बाबरीच्यावेळी शिवसेना कुठे होती हे तुमच्या नेत्यांना विचारा असे संजय राऊत म्हणाले होते. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पलटवार केला, म्हणाले, बाबरीच्या वेळी राऊत गेले होते का ? तलवारीशिवाय माध्यमांसमोर यायचं आणि मग आयजीच्या जीवावर बायजी उदार, अशी अवस्था आहे.

https://www.facebook.com/100044272187486/posts/574640427355025/?app=fbl

प्रत्यक्ष मैदानात उतरुन संजय राऊत यांनी काम करावं, काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यात आता अर्ध्या डोक्याचा हा शब्द ऍड झालाय. जी लोकं याठिकाणी नाही त्यांना विचारा असे सांगत सोयीचे बोलायचे आणि वागायचं, हे संजय राऊत यांचे काम आहे, असे दरेकर म्हणाले.

दरम्यान, राऊत यांनी राज ठाकरे यांच्या कालच्या झालेल्या सभेवर बोलताना राज यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, भोंग्याचा विषय हा कायद्याच्या चौकटीतील आहे. भोंग्याचा मुद्दा काढून मुळ विषयाला बाजूला ठेवण्याचे काम चालू आहे. हे काम काही लोकांकडून भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now