प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या सुपरहिट वेब सिरीजच्या दोन्ही मालिकांनी MX Player वर आग लावली आहे. यामध्ये बॉबी देओल यांच्या निगेटिव्ह व्यक्तीरेखेला प्रेक्षकांनी पसंती दिली. तसेच त्रिधा चौधरीने तिच्या अभिनयाने तर सर्वांना थक्क केले. त्रिधा चौधरीने सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंनी तर चाहत्यांचे पाणी पाणी झाले आहे.
आश्रम या वेब सिरीजमुळे त्रिधा चौधरीला एक वेगळी ओळख मिळाली. वेब सिरीजनंतर लोक तिला ‘बबिता’ म्हणून हाक मारायला लागले. तिच्या अभिनयाचे लोकांनी कौतूक केले. आता तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या बोल्ड स्वभावासाठी आणि बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध आहे.
तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट एकदम हॉट फोटोंनी भरलेलं आहे. अलीकडेच त्रिधाने तिचा ऑरेंज कलरमधील बिकिनी फोटो शेअर केला होता, जो लोकांना खूप आवडला होता. त्रिधा चौधरी तिचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही, असे कधी होत नाही. फोटो शेअर केल्यानंतर तो व्हायरल होत असतो.
दरम्यान, नुकतेच तिला तिच्या एका बोल्ड फोटोवरुन ट्रोल देखील केले होते. यावर तिने एका मुलाखतीत उत्तर दिले होते. म्हणाली, लोक पडद्यावर काय पाहतात आणि पडद्यामागे काय चित्रित केले जाते यात खूप फरक आहे. तसेच तिला आता वेगळी भूमिका करायची इच्छा असल्याचे तिने सांगितले.
तसेच, तिच्या चाहत्यांनी तिला जशी आहे तशी स्वीकारुन तिला प्रेम द्यावे, असे त्रिधाचे मत आहे. दरम्यान, आता आश्रमच्या तिसर्या मालिकेचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. आश्रमातील बबिता आता कोणत्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
माहितीनुसार, प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ ची तिसरी मालिका 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन सीझनमध्ये बाबा निरालाच्या नवीन अभिनय आणि मनोरंजक ट्विस्टसाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.