Share

Babasaheb Prabhakar Aage : ‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याचा भर रस्त्यात खून; बीड पुन्हा हादरले

Babasaheb Prabhakar Aage : माजलगाव शहरात भरदिवसा घडलेल्या एका थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस आणि बीड(beed) जिल्हा लोकसभेचे विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे(Babasaheb Prabhakar Aage) (वय 34) यांचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

घटनास्थळी संतप्त वातावरण

ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता माजलगाव बसस्थानकाजवळील भाजप कार्यालयासमोर घडली. बाबासाहेब आगे आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजप कार्यालयात बसले असताना, ते बाहेर पडताच हातात कोयता घेऊन नारायण शंकर फपाळ (वय 38)0 नावाचा आरोपी त्यांच्या दिशेने धावला. अचानक हल्ला टाळत बाबासाहेब(Babasaheb Prabhakar Aage ) पुढे धावले, आणि “वाचवा” असे म्हणत रस्त्याच्या कडेला असलेल्या ओट्यावर बसलेल्या लोकांकडे गेले. मात्र नारायण फपाळने पाठलाग करत पाठीमागून त्यांच्यावर जोरदार वार केले.

“बलात्कार करतो का?” म्हणत सपासप वार

हल्ला करताना आरोपीने, “बलात्कार करतो का?” असे म्हणत संतापाने बाबासाहेब यांच्यावर अनेक वार केले. शरीराच्या एका बाजूस गंभीर घाव झाल्याने बाबासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वनियोजित खून?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण फपाळ सकाळपासूनच बाबासाहेब यांचा पाठलाग करत होता. भाजप कार्यालयाजवळील एका दुकानासमोर दबा धरून बसलेल्या नारायणने बाबासाहेब बाहर पडताच अचानक हल्ला चढवला.

पोलीस ठाण्यात दिली कबुली

हत्या केल्यानंतर आरोपी नारायण फपाळ स्वतःहून माजलगाव पोलीस ठाण्यात गेला आणि आपल्यानेच बाबासाहेब आगे(Babasaheb Prabhakar Aage) यांचा खून केल्याची स्वीकृती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

ही घटना राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी ठरली असून, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिसांकडून आरोपीच्या हत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
babasaheb-prabhakar-aage-was-brutally-murdered-by-stabbing-him-with-a-sickle

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now