आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं.
राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. मात्र काही भागात चित्र काहीस सकारात्मक पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचा पहिला परिणाम पनवेलमध्ये पहायला मिळाला आहे.
याबाबत खुद्द मनसेकडून दुजोरा देण्यात आला आहे. याबाबत मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ‘आज पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांची आणि ६ वाजून ८ मिनिटांची अजान भोंग्यावरुन न होता फक्त तोंडाने बोलून झाली,’ असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच पनवेलमधील मुस्लीम बांधवांनी राज ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून मुस्लीम बंधवांचे आभार देखील चिले यांनी व्यक्त केले आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये सकाळपासूनच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या २९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदिवली, जळगाव, नवी मुंबईत अजानवेळी हनुमान चालीसा लावल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले असून, मुंबईसह काही ठिकाणी अजानावेळी हनुमान चालीसा लावण्यात आली. मात्र, दुसरीकडे माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुणेसह अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान झाल्याची माहिती मिळाली असून, मशिदींबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
वातावरण बिघडवणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, औरंगाबादमध्ये ४८ मशिदींबाहेर कडक बंदोबस्त
अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर संदीप देशपांडेंची तुरी, वाचा नेमकं काय घडलं?
‘आई वडील करत आहेत फोन, पण मी ९ वर्षांपासून घरी गेलो नाही’, वाचा कुमार कार्तिकेयचा संघर्षमय प्रवास
राणादाचं लग्न ठरलं, आजच झाला साखरपुडा; नवरीचे नाव ऐकून प्रचंड खूश व्हाल