औरंगजेब वाईट नव्हता म्हणणाऱ्या आझमींना मनसेने झापले; थोबाड फोडल्याची आठवन करून देत म्हणाले…

औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, त्याचा खरा इतिहास जर लोकांसमोर आणला तर कोणताही हिंदू व्यक्ती त्याच्यावर नाराज होणार नाही, पण सध्या चुकीच्या पध्दतीने औरंजेबचा इतिहास दाखवला जात असल्याचं विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं होतं. त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.

अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील अबू आझमी यांच्यावर टीका केली आहे, तसेच महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे.

गजानन काळे यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते गजाजन काळे यांच्यावरही टीका केली आहे. तसेच त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या विधानसभेतील खळखट्याकची आठवण करुन देत अबू आझमींवर निशाणा साधला आहे.

गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अबू आझमींवर निशाणा साधला आहे. म्हणाले, औरंगजेब वाईट नव्हता त्याचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. हे बोलणारा अबू आझमी शिवरायांच्या महाराष्ट्रातून निवडून येतो. मविआ सरकारला पाठिंबा दिला म्हणून या औरंग्याच्या औलादीवर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची नवाब सेना मूग गिळून गप्प आहे का? या आझमीचे थोबाड स्व. रमेश वांजळेंनी फोडले होते.

 

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले, औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे.

म्हणाले, तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही, असे अबू आझमी म्हणाले होते.