बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) आपल्या बिनधास्त अंदाजामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ताहिरा एका प्रसिद्ध सेलिब्रिटीची पत्नी असण्यासोबतच उत्तम लेखिकासुद्धा आहे. तिने तिच्या पुस्तकात आई आणि महिलांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याबद्दल सांगितले आहे. सोबतच ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही मोकळेपणाने बोलत असते. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना ताहिराने पती आयुष्मान खुरानासोबतच्या तिच्या सेक्स लाईफबाबत भाष्य केले आहे.
ताहिरा नुकतीच शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी शिल्पा आणि ताहिरा दोघींनी खूप मजामस्ती केली. तसेची दोघींनी अनेक विषयावर चर्चा केली. यावेळी ताहिराने तिच्या सेक्स लाईफबाबत असा खुलासा केला जे ऐकून शिल्पा आश्चर्यचकित झाली. शोदरम्यान शिल्पाने ताहिराला विचारले की, ‘तु तुझ्या पुस्तकात सेक्स हा शब्द लिहिण्यास किती कंम्पर्टेबल आहेस?’
यावर उत्तर देताना ताहिराने सेक्स कॅलरीज बर्न करण्यासाठी उत्तम वर्कआऊट असल्याचे म्हटले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर आमच्या बाबतीत खूप कॅलरीज बर्न होतात, असेही ती यावेळी बोलून गेली. ताहिराच्या या स्पष्टवक्तेपणामुळे सर्वचजण आश्चर्यचकित होत आहेत.
यावेळी ताहिराने तिच्या कॅन्सरच्या प्रवासादरम्यानचा अनुभवही शेअर केला. तिने सांगितले की, कॅन्सरच्या उपचारादरम्यान तिने तिचे सर्व केस कापले होते. त्यावेळी ती घरात एकटीच होती. केस कापल्यानंतर जेव्हा तिने स्वतःला आरश्यात पाहिला तेव्हा तिला वाटले की, ही सेक्सी व्यक्ती कोण? ताहिराने म्हटले की, ‘त्यादिवशी मला स्वतःलाच मी खूप सेक्सी वाटत होते’.
सोनाली बेंद्रेमुळे प्रेरणा मिळाली.
ताहिराने पुढे बोलताना सांगितले की, सोनाली बेंद्रेचे कॅन्सरच्या उपचारादरम्यान बाल्ड लुक पाहून तिला आश्चर्य वाटले होते. सोनाली अमेरिकेतून कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतली होती. तेव्ही ती बाल्ड लूकमध्ये दिसून आली होती. परंतु, सोनालीच्या ६ महिन्यानंतर तिला स्वतःला अशा परिस्थितीतून जावं लागेल, असे तिला वाटलं नव्हतं, असं ताहिराने म्हटले.
दरम्यान, आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांचे लग्न नोव्हेंबर २००८ मध्ये झाले होते. या दोघांना दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलाचे नाव विराजवीर आणि मुलीचे नाव वरूष्का असे आहे. आयुष्मानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास त्याने ‘विकी डोनर’, ‘दम लगा के हैशा’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’, ‘आर्टिकल १५’ अशा चित्रपटात काम केले आहे.
‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटात विकी शेवटचा दिसला होता. तर लवकरच तो ‘डॉक्टर जी’, ‘अनेक’ आणि ‘अॅन अॅक्शन हिरो’ अशा चित्रपटात दिसणार आहे. २७ मे रोजी त्याचा ‘अनेक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये तो एका गुप्त पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूख खान आणि हिरानींच्या ‘डंकी’च्या सेटवरचा पहिला फोटो आला समोर, असा असेल नजारा
वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या महिला दिसतात परीपेक्षा सुंदर, स्टाईलमध्ये अभिनेत्रींनाही टाकतील मागे, पहा फोटो
PHOTO: असं आहे अजय आणि काजोलचे आलिशान घर; घराच्या किंमतीचा आकडा ऐकून बसेल धक्का