Share

भारतातील आयुर्वेदिक उपचाराने या देशाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीची दृष्टी आली परत; कौतूक करत म्हणाले..

केनियाचे माजी पंतप्रधान अमोलो ओडिंगा यांच्या मुलीची भारतातील आयुर्वेदिक उपचाराने प्रकृती सुधारली आहे. यावर भारतातील आयुर्वेदाचं त्यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची दिल्लीत भेट झाली, तेव्हा त्यांनी आयुर्वेदाबद्दल मोदींशी चर्चा केली.

अमोलो ओडिंगा यांच्या मुलीचे नाव रोझमेरी असून, तिला ब्रेन कॅन्सरमुळे 2017 वर्षांपासून अंधत्व आलं आहे. त्यांनी तिचे उपचार चीन, दक्षिण आफ्रिका इस्राईल याठिकाणी केले, मात्र तिच्या प्रकृतीत काहीच सकारात्मक फरक आला नाही. त्यामुळे ते मुलीला घेऊन भारतातील केरळ मध्ये आयुर्वेदिक उपचारासाठी आले होते. त्या उपचारानंतर त्यांच्या मुलीच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसू लागले.

केरळ मधील कूथाट्टुकुलम येथील श्रीधरियम आयुर्वेदिक नेत्र रुग्णालयात त्यांनी मुलीचे उपचार घेतले. दरम्यान, अमोलो ओडिंगा यांनी ट्विट करत सांगितले होते की, “मी केरळमधील कोची येथे माझ्या मुलीच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी भारतात आलो होतो. तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्याच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा झाली. आमच्या मुलीला जवळजवळ सर्व काही दिसते हे माझ्या कुटुंबासाठी एक मोठे आश्चर्य होते.”

तसेच म्हणाले, “या पारंपारिक औषधांचा वापर केल्याने शेवटी त्यांची दृष्टी परत आली आणि त्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. ही उपचार पद्धत (आयुर्वेद) आफ्रिकेत आणण्यासाठी आणि उपचारासाठी आमच्या देशी वनस्पतींचा वापर करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे.”

जर मला केनियाचे राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर नैरोबीमध्ये श्रीधरियम आय हॉस्पिटलची स्थापना करणे यास त्यांचे प्राधान्य असेल. माझ्या मुलीच्या उपचारासाठी आपण जगातील विविध शहरांमध्ये फिरलो, परंतु काही उपयोग झाला नाही. असे अमोलो ओडिंगा म्हणाले.

त्यांची मुलगी रोझमेरी ओडिंगा म्हणाली की, 2019 मध्ये जेव्हा ती पहिल्यांदा कूथाट्टुकुलममध्ये उपचारासाठी आली तेव्हा तिची दृष्टी जवळजवळ शून्य होती. आता मी माझ्या फोनवर आलेले मेसेज आणि माझ्या कुटुंबियांनाही वाचू शकते आणि यासाठी मी श्रीधरमची ऋणी आहे.

मुलीच्या उपचारासाठी 2019 मध्ये ते प्रथमच श्रीधरियम येथे आले, कारण त्यांनी आयुर्वेदिक नेत्र उपचाराबद्दल ऐकले होते. मुख्य चिकित्सक नारायणन नंबूदिरी आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली श्रीधरियम येथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. चार महिन्यांतच तिची दृष्टी परत आली आणि ती केनियाला परत गेली.

दरम्यान, दिल्ली मध्ये केनियाचे माजी पंतप्रधान अमोलो ओडिंगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. तेव्हा अमोलो ओडिंगा या विषयी मोदींशी चर्चा केली, भारतातील आयुर्वेदाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे त्यांनी, आयुर्वेदाला आफ्रिकेत नेण्याची इच्छा बोलून दाखवली.

इतर

Join WhatsApp

Join Now