shivsena : शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी – कॉंग्रेसमध्ये देखील भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे. अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शिवसेनेला भगदाड पडल्याच पाहायला मिळालं आहे. मात्र आता हीच परिस्थिती राष्ट्रवादी – कॉंग्रेसची होणार असल्याच बोललं जातं आहे. हे सांगण्यामागील कारण म्हणजे, कोल्हापुरात राष्ट्रवादी – कॉंग्रेसला धक्क बसणार असल्याच बोललं जातं आहे. याचे धक्के थेट राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बसणार असल्याच बोललं जातं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे पक्षावर नाराज असल्याच गेल्या काही दिवसांपासून बोललं जातं आहे. आणि याच कारणामुळे ते आता शिंदे गटात सामील होणार असल्याच वृत्त समोर आलं आहे. यामुळे राष्ट्रवादीला कोल्हापुरात खिंडार पडणार असल्याचं बोललं जातं आहे.
कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याचं कारण देत पाटील हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच बोललं जातं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर ए. वाय. पाटील यांची भेट घडवून आणल्याचे देखील सांगितलं जातं आहे.
ए. वाय. पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरणार आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, ए. वाय. पाटील यांनी बंड करुन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर पक्षाला आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्का बसू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल