Share

‘या’ गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात

Tiku Weds Sheru

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर नवाजसोबत या चित्रपटात एक नवोदित अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत आहे. या अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.

व्हायरल होणाऱ्या फोटोतील ही चिमुकली म्हणजे अभिनेत्री अवनीत कौर होय. बालकलाराच्या रूपात पदार्पण केलेल्या अवनीतने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. आपल्या कौशल्याच्या आधारावर तिने सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका स्टारपेक्षा कमी नाही.

‘डान्स इंडिया डान्स – लिटील मास्टर’ या शोद्वारे अवनीतने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘डान्स के सुपरस्टार्स’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला. डान्सनंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ‘एक मुठ्ठी आसमान’, ‘मेरी माँ’, ‘टेढे है पर मेरे है’, ‘सावित्री’ यासारख्या मालिकेत काम केले. तसेच ‘करीब करीब सिंगल’, ‘मर्दानी’ या चित्रपटातही ती दिसून आली.

सध्या अवनीत ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे अवनीत फार चर्चेत आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीनच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावरही अवनीत नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती दररोज तिचे अनेक लेटेस्ट फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोतील अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात. अवनीतचे लेटेस्ट फोटो पाहिल्यास सध्या तिच्यात थोडेस बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतीच काही दिवसांपूर्वी अवनीतने तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोत अवनीत निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून आली होती. या ड्रेसवर तिने लाईक मेकअप करून स्ट्रेटनिंग केलेले केस मोकळे सोडले होते. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now