१ मे रोजी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. राज ठाकरे यांनी ‘३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील,’ असा अल्टिमेटम दिला.
तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या, त्या अटींचे उल्लंघन त्यांनी केले असल्यामुळे राज ठाकरेंच्या विरोधात औरंगाबाद सिटी चौक पोलिस ठाण्यात आज एफआयआर दाखल करण्यात आला. यामुळे आता मनसे आणखीच आक्रमक झाली आहे.
अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मस्जिदवरील भोंगा वाजला तर सकाळी ५ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असा गर्भित इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सभेत बोलताना राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाही आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरु झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्यात धडकणार, असा इशाराच जाधव यांनी दिला आहे.
पुढे बोलताना जाधव म्हणाले, ‘भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदी बाहेर संघर्ष करणार,’ असंही ते म्हणाले. दरम्यान, ‘हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच…भोंगे बंद झालेच पाहिजे, शेवटचा १ दिवस…,’ अशी फेसबुक पोस्ट अविनाश जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे राज्याच लक्ष लागले आहे. आता या प्रकरणावरून राजकारण तापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ईदनिमीत्त शाहरुखचा चाहत्यांसाठी खास स्टंट, आवडत्या स्टारची झलक पाहून चाहत्यांचा जल्लोष; पहा व्हिडीओ
पाठकबाईंचं लग्न अखेर ठरलं, साखरपुडाही झाला; नवरदेवाचे नाव ऐकून धक्काच बसेल
आता नाही तर कधीच नाही! उद्याच्या आंदोलनासाठी राज ठाकरेंनी देशातील हिंदूंना दिला ‘हा’ आदेश
तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं ऐकणार की बेगडी शरद पवारांचं? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल`