Share

बीडच्या शेतकरीपुत्राने रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

प्रियांकाच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदकानंतर, स्टीपलचेसर अविनाश साबळे याने 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. तो मुळचा बीडचा आहे. 13 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडून हे पदक जिंकले.

त्याने 8:11:20 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 च्या नवव्या दिवशी भारताचे हे दुसरे पदक आहे. अविनाश साबळे सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त 0.5 सेकंद मागे होता. अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली.

अविनाश साबळे हा भारतीय सैन्यात सेवा करणारे ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. तो 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने यामध्ये खुप नाव कमावले आहे. अविनाश साबळेच्या वडिलांचे नाव मुकुंद साबळे आणि भावाचे नाव योगेश साबळे आहे.

त्याचे वडील शेतकरी आहेत. अविनाशने सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून घेतले आणि पुण्यातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या अविनाश बंगळुरूमध्ये कुटुंबासह राहत आहे. 2011 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो सैन्यात दाखल झाला आणि तेथून त्याने खेळात भाग घेण्यास सुरुवात केली.

2015 मध्ये तो आर्मी सर्व्हिस टीमसाठी पात्र ठरला. 2 वर्षानंतर, त्याने 2017 क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला, त्यानंतर त्याने सतत खेळांमध्ये भाग घेऊन चांगली कामगिरी केली. सध्या अविनाशची लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) म्हणून नियुक्ती आहे.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वर्चस्व गाजवले. एकाच दिवसात 3 सुवर्ण पदकांसह 6 पदके जिंकून भारताने हे सिद्ध केले की, भारताचे कुस्ती जगामध्ये वलय आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. अंशू मलिकने रौप्य तर दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवालने भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे.

महत्वाच्या बातम्या
Gang Rape Case: दिल्लीतील निर्भयापेक्षाही भयानक घटना महाराष्ट्रात; पिडीत महीलेची भयंकर स्थितीत मृत्यूशी झुंज
Dipak Kesarkar: दिपक केसरकरांना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून हटवले; ‘हा’ नेता असेल नवा प्रवक्ता
Ajit Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस! अजितदादांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने ‘हा’ बडा नेता नाराज
BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now