काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मशिदीवरील भोंगा, हनुमान चालीसा या विषयांवरून राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर चांगलाच गदारोळ माजला. त्यानंतर जे ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अयोध्या दौऱ्याबद्दल घोषणा केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चर्चेत आले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह.
‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी भाजप खा. ब्रिजभूषण सिंह यांनी दिली होती. त्यानंतर देखील अनेक आरोप – प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले.
मात्र अशातच राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि मनसैनिकांच्या आनंदावर विरजण पडले. राज यांनी दौरा स्थगित केला. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं होतं की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं.
मात्र, राज ठाकरेंचा पठ्ठ्या ठरलेल्या दिवशी अयोध्येत पोहोचलाच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत आल्यावर रविवारी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून याबद्दल माहिती दिली.
राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार तेव्हा त्यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी दिला होता. यावर बोलताना जाधव म्हणाले, ‘आव्हान स्वीकारत आम्ही थेट अयोध्येत जाऊन पोहोचलो आहोत.’
दरम्यान, ‘कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना जागा दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. यामुळे पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्रीच्या फोटोंनी उडाली खळबळ, ब्लाऊज न घालताच उभी राहिली बाल्कनीत, पहा फोटो
सुपरस्टार प्रभासने ‘या’ बड्या डायरेक्टरच्या चित्रपटाला मारली लाथ, नेमकं काय आहे प्रकरण, वाचा
क्रेटा, ब्रेझा सगळ्यांना मागे टाकत टाटाची ‘ही’ नंबर 1, एका महिन्यात 14 हजार युनिट्सची विक्री
जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?