शनिवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विराट सभा पार पडली. तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होतं आहे. फेसबुक पोस्ट करत जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे. ‘मुंबई चा बाप राज साहेबच..!’, जाधव यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये जाधव यांनी ‘मुंबईत विराट सभा फक्त राज साहेबच घेऊ शकतात..!,’ असं म्हंटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. यासोबतच ठाकरेंची सभा झाल्यानंतर त्यावरून शिवसेना आणि भाजपा-मनसे यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेकडे लागलं होतं. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा होती. म्हणून या सभेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे या लाखो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.
शिवसैनिकांसोबतच शिवसेनेचे अनेक नेते मंडळी देखील या सभेला उपस्थित होते. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. तर आता कालच्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज यांना लक्ष केलं आहे.
यामुळे पुन्हा मनसे आणि सेनेतील वाद चिघळणार असल्याच बोललं जातं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष केलं आहे. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक म्हणत त्यांचा गौरव केला आहे. नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून नाव न घेता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत बोलताना नांदगावकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “शिवाजी पार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे आहेत. बाकी सगळे….जय हिंद जय महाराष्ट्र” असे खोचक ट्विट नांदगावकर यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांनी खास शैलीत विरोधकांना घेरले; वाचा ‘मास्टर’ सभेत उद्धव ठाकरेंनी मारलेले प्रमुख टोमणे
या मुन्नाभाईच्या डोक्यात केमीकल लोच्या झालाय, फिरू द्या त्याला; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
पं. शिवकुमार शर्मांच्या जळत्या चितेसमोर गुमसूम झालेला दिसला दिग्गज कलाकार, फोटोने सर्वांनाच रडवले
सोहेल खानसोबत संसार मोडणारी सीमा खान आहे मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची मेहुणी, जाणून घ्या