Share

‘Avatar 2’ च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी आणि ‘इथे’ पाहायला मिळणार चित्रपटाचा ट्रेलर

Avatar 2

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित ‘अवतार २’ (Avatar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत अनेक बातम्या समोर आल्या. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत होते. तर आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे.

‘अवतार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमरून यांनी केलं होतं. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. तर ‘अवतार पार्ट १’ नंतर आता तब्बल १३ वर्षानंतर जेम्स या चित्रपटाचा सीक्वेल घेऊन येत आहेत. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ असे अवतार चित्रपटाच्या सीक्वेलचे नाव असणार असून १६ डिसेंबर रोजी तो सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. १६० भाषांमध्ये हा चित्रपट पाहणार प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्टनुसार, ‘अवतार २’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असला तरी जेम्स कॅमरून प्रदर्शनाच्या सात महिन्याअगोदरपासूनच चित्रपटाच्या प्रमोशनास सुरुवात करत आहेत. यादरम्यान चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही एक मोठी बातमी समोर येत आहे. बातम्यांनुसार, ‘अवतार २’ या चित्रपटाचा पहिला ट्रेलर मार्वल स्टुडिओजच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या चित्रपटाच्या सीक्वेल चित्रपटासोबत सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘डॉक्टर्स स्ट्रेंज इन मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ असे ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या चित्रपटाच्या सीक्वेलचे नाव आहे. तर हा चित्रपट ६ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानुसार ‘अवतार २’ चा पहिला ट्रेलरही या चित्रपटासोबत ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या एक आठवड्यानंतर हा ट्रेलर ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, ‘अवतार २’ चा ट्रेलर सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला (MCU) खूप फायदा होणार आहे. कारण जे दर्शक MCU चे चाहते नाहीत आणि त्यांना ‘अवतार २’ ची पहिली झलक पाहायचे आहे ते लोक ट्रेलर पाहण्यासाठी नक्कीच सिनेमागृहात येतील. याचा थेट परिणाम मार्वल चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर पाहायला मिळेल.

दरम्यान, ‘अवतार’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कमाई केली होती. यामध्ये जो फॅंटसी वर्ल्ड दाखवण्यात आला होता ते पाहून अनेकजण आश्चर्चचकित झाले होते. तर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये असं काय घडलं की संपूर्ण टीमला मागावी लागली माफी?
National Language Controversy : अजय-सुदीपच्या हिंदी भाषेच्या वादावर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘प्राईम टाईम आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’; शेर शिवराजला प्राईम टाईम न मिळाल्याने संतापला अभिनेता

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now