Share

महिला पोलिस म्हणाली, ‘रिक्षा नीट चालव’, संतप्त रिक्षाचालकाने तिला रिक्षात ओढलं आणि.., पुण्यातील धक्कादायक प्रकार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील महिलांसोबत घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षितेबाबतच्या प्रश्नांनी आपले तोंडवर काढले आहे. अशा स्थितीतच पुण्यातून यासंबंधीत आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारतमाता चौकात एका रिक्षा चालकाने महिलेला जबरदस्तीने रिक्षात खेचून तिच्यावर विनयभंग केला आहे.

पिडीत महिला खुद एक पोलीस कर्मचारी असल्यामुळे तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ९ च्या आसपास घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षाचालक व्यवस्थित रिक्षा चालवत नसल्यामुळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न इतर पोलिसांनी केला.

मात्र तरी देखील तो थांबला नाही. त्यामुळे पुढे येऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याने या रिक्षा चालकाची रिक्षा अडवली. तसेच रिक्षा नीट चालविण्यासाठी ठणकावून सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकाने या पोलीस महिला कर्मचाऱ्याला रिक्षात बळजबरीने ओढले.

तसेच तिचा विनायभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षात इतरही दोन व्यक्ती होती. या घटनेनंतर पोलिसांनी या तिघांवर कारवाई केली आहे. संबंधीत घटनेतील आरोपींचे नाव विश्वदीप भरत मादलापुरे (वय-19), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय-19), सुनिल शिवाजी कसबे (वय-20) असे आहे.

आता या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसाढवळ्या महिलांसोबत विनयभंगाच्या घटना घडत आहेत.

या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने निर्भया पथक जारी केले असले तरी या घटनांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. इतकेच नव्हे तर, अशा कित्येक घटना आहेत ज्यात आरोपींवर कारवाईही करण्यात आलेले नाही.

महत्वाची बातमी
‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..
‘गंगूबाई काठियावाडी’ पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; बायकोही झाली थक्क
या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिले? त्यावरूनच कळेल तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे? क्लिक करा आणि जाणून घ्या…
ज्याला भुताटकी म्हणायचे, तोच बंगला विकत घेऊन राजेश खन्नाचे चमकले नशीब; दिले अनेक हिट चित्रपट

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now