मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी औरंगाबाद(Aurangbaad) दौऱ्यावर असताना जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांना पदावरून हटवले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे दाशरथे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. तसेच या निर्णयाविरोधात समाज माध्यमांतून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. सुहास दाशरथे जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील पक्षात सक्रिय होते.(aurangbaad suhas dashrathe resign from mns party)
राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहणार आहोत, असे सुहास दाशरथे यांनी सांगितले होते. या प्रकरणात सुहास दाशरथे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. सुहास दाशरथे यांना पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात आलं. पक्षात त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं होतं. तरी देखील सुहास दाशरथे हे पक्षातुन बाहेर पडले नाहीत.
पण अखेर आज सुहास दाशरथे यांनी मनसे पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. सुहास दाशरथे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुहास दाशरथे यांनी हात जोडतानाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “साहेब धन्यवाद, माझा आपणास शेवटचा जय महाराष्ट्र.” यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी सुहास दाशरथे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी सुहास दाशरथे शिवसेना पक्षात होते. शिवसेना पक्षात असताना सुहास दाशरथे आक्रमक भूमिका घेत नव्हते. पण मनसेत प्रवेश केल्यानंतर दाशरथे एखादा प्रश्न मांडताना आक्रमक भूमिका घेऊ लागले. काही महिन्यांपूर्वी मनसे जिल्हा प्रमुख असताना सुहास दाशरथे यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्यावर पत्रके भिरकावली होती.
औरंगाबाद जिल्हा प्रमुख असताना सुहास दाशरथे यांनी मनसेच्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले होते. सुहास दाशरथे शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना जाब विचारायचे. त्यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलून धरला होता. तसेच त्यांनी शहरातील वीज, कचरा आणि रस्ते या प्रश्नांवर देखील आक्रमक आंदोलन केले होते.
कोरोना काळात सुहास दाशरथे यांनी औरंगाबादमधील सामान्य लोकांना भरपूर मदत केली होती. पण पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, अशी टीका त्यांचे समर्थक करत आहेत. सुहास दाशरथे पक्षातून बाहेर पडल्यामुळे औरंगाबाद जिल्हयात मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. आता सुहास दाशरथे कोणत्या पक्षात जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार
भाजपच्या अंगातील माज अजून गेला नाही, त्यांची जिरवण्याची गरज आहे – धनंजय मुंडे
शिवसेनेच २५ आमदार नाराज; ‘या’ कारणावरून आपल्याच सरकारविरोधात थोपटले दंड