Share

औरंगाबादचे राजकारण तापणार, संजय शिरसाटांना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी उतरवला ‘हा’ हुकुमी एक्का

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना जाता जाता औरंगाबादच्या नामांतराचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आजतागायत औरंगाबादचे राजकारण वेगवेगळ्या प्रश्नांमुळे ढवळून निघाले. त्यातच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये औरंगाबादच्या तीन आमदारांना मंत्रीपद दिले गेले. यामुळे औरंगाबादला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. (Aurangabad politics will heat up)

नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबादचे राजकारण तापलेले आहे. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिंदे गटात गेलेल्या औरंगाबादच्या दोन आमदारांना एकनाथ शिंदेने मंत्रीपदं बहाल केली. पैठणचे संदिपान भुमरे व सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांना भाजप- शिंदे गट युती सरकारमध्ये मंत्रीपद आहे.

शिंदे गटात सामील झालेले आणि सातत्याने उद्धव ठाकरे व शिवसेनेवर सडकून टीका करणारे संजय शिरसाट यांना मात्र मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

सातत्याने संजय शिरसाट यांनी ठाकरे आणि शिवसेनेवर शिरसंधान साधले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पण शिरसाट यांना आव्हान देणाऱ्या अंबादास दानवेंना विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता केले. याच अंबादास दानवेंवर पूर्वी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेकडून निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर अनेक संघर्षातून दानवे गेले. विधानपरिषद, विधानसभा, नगरपालिका, नगरपरिषद असा मोठा अनुभव दानवेंना आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील शिवसैनिकांचा मावळलेला उत्साह परत आणण्यास अंबादास दानवे उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का ठरू शकतात.

मात्र औरंगाबादमध्ये भाजपची ताकद वाढवण्याचे दृष्टीने भाजप आणि शिवसेना दोघांमध्ये छुपा संघर्ष देखील यामुळे सुरू झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीनेच का होईना, पण भाजपला देखील औरंगाबादमध्ये आपली ताकद वाढवायची आहे.

महत्वाच्या बातम्या-
Dhananjay Munde: …त्यामुळे धनंजय मुंडेंनी तब्बल दोन वेळा घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण
Mukesh Khanna : ‘तुम्ही मुर्ख आहात’, नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर भडकला ‘शक्तीमान’, वाचा नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: शपथ घेताच शिंदे गटातील मंत्री रुग्णालयात दाखल, पुणे दौऱ्यावर असताना बिघडली तब्येत

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now