मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. औरंगाबादमध्ये त्यांची सभा पार पडली. या सभेतही राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि ४ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता ३ तारखेनंतर काय होतंय? याकडे पुर्ण राज्याचे लक्ष आहे. याच प्रकरणावर मुंबई पोलिस महासंचालकांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की राज ठाकरेंवर कारवाई होणार का? तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की, राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार.
औरंगाबाद पोलिसांनी भाषण तपासलं आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचं सांगत त्यांनी सक्तीचा इशारा दिला आहे. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडवू नये अशी ताकीदही त्यांनी दिली आहे. तसेच समाजकंटकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यातील जनतेला त्यांनी शांततेतंच आवाहन केलं आहे.
आधीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यात वातावरण तापलेलं असताना सर्व पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि अनेक नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
त्यामध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या बड्या नेत्यांचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्था हाताळण्यात पोलीस सक्षम आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा पुर्ण अभ्यास केला आहे. ते योग्य ती कारवाई करतील, अशी महत्वाची माहिती मुंबई पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली येथे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं.
यानंतर राज ठाकरे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. राज ठाकरेंना कोर्टात हजर करावं असं पोलिसांना शिराळ कोर्टाने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
‘ती’ बातमी भेटताच अनुष्कासमोर ढसाढसा रडला होता विराट कोहली; स्वत:च सांगितला भावूक किस्सा
लाठीचार्ज होताच पळणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो; फडणवीसांचा ‘तो’ फोटो व्हायरल
मनसेच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही; राज ठाकरे पडले एकटे
राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्यानंतर मनसेत नाराजीचा सुर; आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा