१०० रूपयांना सांगीतलेला आनंदाचा शिधा २०० रूपयांना पडणार, तेल गायब; सामान्यांची दिवाळी संकटात

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी..! मात्र असं असलं तरी देखील यंदाची दिवाळी ही बळीराजासाठी फारशी आनंदाची नाहीये. हे सांगण्याच कारण म्हणजे, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना दिवाळीत आर्थिक फटका बसला आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने नागरिकांसाठी एक मोठी गुडन्यूज दिली आहे. ती म्हणजे, दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा गुरुवारपासून लोकांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन अन्न आणि नागरीपुरवठा मंत्र्यांनी दिलं.

मात्र, असं असलं तरी देखील राज्यभरातल्या अनेक रेशन दुकानांवर या किटचा पत्ताच नाहीये. तर काही काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्यानं समोर आलं आहे. अशातच एक बातमी समोर येतं आहे. ती म्हणजे, ‘आनंदाचा शिधा’तून तेल गायब झालं असल्याच वृत्त समोर आलं आहे.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार, या तीन वस्तू देतांना 75 रुपये आकारले जात आहेत. ‘आनंदाचा शिधा’मध्ये तेल नसल्याने आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तले विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे आता नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडणार आहे.

दरम्यान, राज्यातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधाची घोषणा शिंदे सरकारने केली आहे.

आनंदाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल