aurangabad 5 year old child death | लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मुलं खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. मुलं खेळत असताना अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. आता असाच एक प्रकार औरंगाबच्या सोमपुरीमधून समोर आला आहे.
पाच वर्षाच्या चिमुकल्याला तारेचा शॉक लागला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे त्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. आईचं लक्ष दोन मिनिटं काय दुसरीकडे गेलं त्यातच अशी घटना घडली आहे.
अनस इलियास शेख असे त्या लहान मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनस हा घरामध्ये खेळत होता. खेळत असताना तो खेळता खेळता घराबाहेर पडला. त्यावेळी करंट असलेली एक तार अंगणात लटकलेली होती. त्या विजेच्या तारेला अनसने खेळता खेळता स्पर्श केला.
आई त्यावेळी कामात व्यस्त होती. त्यानंतर काही लोकांनी बघितले की अनसला काहीतरी झाले आहे. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे पाहून त्याची आई बाहेर आली. त्यानंतर लगेचच अनसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अनसच्या जाण्याने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आईवडिलांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असून त्यांना रडू आवरत नाहीये. आपलं बाळ आता या जगात राहिलेलं नाही. हे आईवडिलांना मान्यच होत नाहीये. त्यामुळे त्यांचे अश्रूही थांबत नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
Atul : एकावेळी दोन मुलींशी लग्न करणाऱ्या अतुलचा खरा चेहरा आला समोर; तिन्ही बायकांनी दाखल केली तक्रार
..म्हणून पुण्यात येणाऱ्या ब्रिजभुषणला मनसे विरोध करणार नाही; समोर आले चक्रावून टाकणारे कारण
तात्या भंगार माणसांमुळे पक्ष सोडू नका, तुमच्यात आम्हाला राजसाहेब दिसतात; कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती