Share

आठ वर्षांपासून काकूचे होते पुतण्यासोबत संबंध, पतीला कळल्यानंतर जे झालं त्यानं अख्खं गाव हादरलं

crime

अलीकडे मोठ्या प्रमाणात धक्कादायक घटना घडत आहेत. प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, अशीच एक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेमाआड येणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला आहे.

वाचा नेमकं घडलं काय..? प्रेम ही अशी भावना कधी कोणावर केव्हा होईल हे कोणच सांगू शकत नाही. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याच्या उसरहा गावात देखील असच प्रेम प्रकरण घडलं. या प्रेम प्रकणात तिसऱ्याचा जीव गेला. मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला कुशवाहा आणि तिचा प्रियकर कैलाश कुशवाहा यांच्यात 8 वर्षांपासून प्रेम संबंध सुरू होते.

धक्कादायक बाब म्हणजे, उर्मिला या विवाहित होत्या. कैलाश हे नात्याने उर्मिला हिचा पुतण्या लागत होता. या काकी – पुतण्याच्या प्रेमकहाणी संपूर्ण गावाला माहिती होती. एके दिवशी शिवकुमार (उर्मिलाचा नवरा) याला हे प्रकरण समजलं. त्याने या प्रेम संबंधास नकार दिला.

त्यानंतर उर्मिला कुशवाहा आणि तिचा प्रियकर कैलाश कुशवाहा याने शिवकुमारच्या हत्येचा प्लॅन रचला. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2021 हा दिवस या दोघांनी हत्येसाठी ठरवला. कैलाशने सांगितल्यानुसार आरोपी उर्मिलाने शिवकुमारला शौचाच्या बहाण्याने विहिरीजवळ नेले.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे विहिरीजवळ कैलाशदेखील आला. कैलाशने कुशवाहाच्या डोक्यात काठीने वार केला. या हल्ल्यात शिवकुमार जबर जखमी झाला. अन् तो बेशुद्ध पडला. त्यानंतर कैलाशने गळा दाबून शिवकुमारची हत्या केली. दोघांनीही शिवकुमारचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

मात्र अवघ्या 48 तासात पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. 6 जून रोजी सापडलेल्या हाडांच्या सापळ्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणात आता उर्मिला कुशवाहा आणि तिचा प्रियकर कैलाश कुशवाहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बिकीनी घालून वामिकाला सायकलवर फिरवताना दिसून आली अनुष्का शर्मा; लोक म्हणाले…
मिल्ट्रीत जाणारा वाघ असल्या पैशांचा हिशोब करत नाय; अग्निपथ योजनेवरुन किरण मानेंचा मोदी सरकारला टोला
अग्निपथ योजनेतून अग्निवीर झालेल्यांना मिळणार १ कोटीचा विमा, ३० दिवसांची सुट्टी, कॅन्टीन सुविधा अन्…; वाचा सविस्तर
जेव्हा तिला भारतरत्न मिळाला तेव्हा.., लतादीदींच्या मृत्यूनंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकरांचा मोठा खुलासा

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now