महाराष्ट्राचे राजकारण बंडामुळे, नवीन सरकारच्या येण्यामुळे ढवळून निघाले आहे. या सर्व परिस्थितीतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राजकीय नेत्यांची सर्वत्र चर्चा होतेय. सध्या श्रीकांत देशमुख या सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा एका महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. (Audio clip of Srikant Deshmukh with a woman goes viral)
श्रीकांत देशमुख यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेने अत्यंत गंभीर आरोप देशमुख यांच्यावर केले आहे. लग्न झाले असूनही त्यांनी फसवल्याचा दावा महिलेने केला आहे. आता अशीच एक श्रीकांत देशमुख आणि संबंधित महिलेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये त्या दोघांमधले संभाषण व्हायरल झाले. त्यात महिला म्हणाली की, तू मला का सांगितलं.. माझे बायकोसोबत तीन वर्ष संबंध नाहीत. तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना, तुला पण सगळं अर्धच भेटणार, तू आमदारच नाहीस बनणार.. लक्षात ठेव.
संबंधित महिला पुढे म्हणाली की, तू माझ्याशी लग्न का केलंस सांग.. तुझा एवढा सुखी संसार होता ना, तुझ्या बायकोचं एवढं प्रेम होतं ना, मग तरीही का असं सांगितलंस… माझे बायकोशी संबंध नाहीत, ३ वर्ष झाली.
काय काय कारस्थान केली. तू आज जसं माझ्याशी वागलाय, त्यामुळे तुला माझं लक मिळणार नाही. तू मला अर्ध अधुरं ठेवलंस ना, तुला पण सगळं अर्धच भेटणार. तुझ्यासोबत पण तसंच होणार. असा तळतळाट त्या महिलेने देशमुखांना दिला आहे.
श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडून घेतला आहे. फसवणुकीचा गंभीर आरोप महिलेने श्रीकांत देशमुखांवर केल्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई त्यांच्यावर होते, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
गुरूपौर्णिमेनिमित्त प्राजक्ता माळीने उघड केले तिच्या गुरूंचे नाव, म्हणाली, त्यांनी माझ्या मनाला…
कर्कश हॉर्न, डीजेवर ठेका, नागीण डान्स; रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप
‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप