Atul Bhatkhalkar : समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अनेकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात मुलायमसिंह यादव यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रकृती चिंताजनक होती. शेवटी सोमवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात आपले प्राण सोडले. राजकीय वर्तुळात अनेकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मात्र, मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायमसिंह यादव असा उल्लेख केला आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो. pic.twitter.com/msDQtpoLXL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2022
“कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो,” असे अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना १९९० मध्ये बाबरी मशीद पाडण्याचा वाद सुरु होता. यावेळी मुलायमसिंह यादव यांनी बाबरी मशीद पाडू पाहणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश सुरक्षा दलांना दिला होता. या गोळीबारात अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमीही झाले होते.
या घटनेवरूनच अतुल भातखळकर यांनी मुलायमसिंह यादव यांचा कारसेवकांवर गोळ्या झाडणारे असा उल्लेख केला आहे. त्यांचे हे वादग्रस्त ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
भाजपचे उमेदवार जिंकण्यामागं होतं हे कारण, अतुल भातखळकरांनी सांगितलं गणित
politics : सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट अन् बापाच्या नावाने थापा; भाजपने ठाकरेंना झापले
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तळपते सूर्य आहेत, पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळाबाहेर फार पडत नाही
sharad pawar : तुमचा पत्राचाळ प्रकरणात सहभाग आहे का? पवारांनी स्पष्टच सांगितलं, आरोप खोटे निघाले तर..