Share

मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल

jitendra avhad

‘मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?,’ असे सवाल उपस्थित करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत त्यांनी आव्हाड यांना लक्ष केलं आहे. यावर जितेंद्र आव्हाड आता काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सुरू करण्यात आला आहे. 24 एप्रिल रोजी दिवंगत लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ यांची 80 वी पुण्यतिथी होती. या खास प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रविवारी मुंबईत पहिला लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवा आणि समाज कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव टाकण्यात आले नव्हते.

त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) उपस्थित नव्हते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याचाच धागा पकडत आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया देत  मंगेशकर कुटुंबाच्या या गोष्टीवर निषेध व्यक्त केला होता.

लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केले होते.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1518259043982544897?s=20&t=1GOBHqmZlWvBUbVHKTZrEA

यावर आता भातखळकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात, ‘कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल बोलवा, इतके वाईट दिवस आहेत. या कुटुंबाची उंची किती?आपली उंची किती? बोलतो किती?,’ असे सवाल उपस्थित करत त्यांनी आव्हाड यांच्यावर टिका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now