Share

‘मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न न करता मुंबईत उर्दू शाळा वाढवण्याचा ठाकरे सरकारचा घाट’

अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ही प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आखत आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होती, त्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीत, असे निर्देश गायकवाड यांनी दिले.

तसेच गायकवाड यांनी लोकप्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरती, शिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचाच धागा पकडत भाजपने ठाकरे सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हणले आहे की, ‘दाढ्या कुरवाळणे सुरूच… मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न न करता मुंबईत उर्दू शाळा वाढवण्याचा ठाकरे सरकारचा घाट असल्याचे त्यांनी म्हणले आहे.

दरम्यान, अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार ज्या ठिकाणी फक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मायलेकीचा बाथरुममध्येच झाला मृत्यु; पोलिसांनी सांगितलेले कारण ऐकून संपूर्ण परिसर हादरला
लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत बहीण उषा मंगेशकरांनी दिली खरी माहिती; अफवा पसरवणाऱ्यांनाही खडसावले
‘या’ कारणामुळे रोहीत शर्माला कसोटी संघाचा कर्णधार करू नका, गावस्करांची आग्रही मागणी
समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला दिलेली एकमेव जागा परत घेतली? वाचा सत्य काय…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now