Share

“खोटे स्टॅम्प पेपर छापून अन् रेशनचे तांदूळ ढापून करोडो मिळत असेल तर पोलिसांकडून खंडणी कशाला घेईल?”

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया होताना दिसून येत आहे. तसेच १०० कोटी वसूली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. पण असे असले तरी सत्ताधारी पक्षातील नेते त्यांची पाठराखन करताना दिसून येत आहे. (atul bhatkhalkar criticize chhagan bhujbal)

अशातच मंत्री छगन भुजबळ यांनीही अनिल देशमुखांची पाठराखन केली होती. गृहमंत्र्याला १०० कोटी कोण देतं? मी पण गृहमंत्री होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. देशमुखांवर असलेले सर्व आरोप खोटे असल्याचेही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटले होते.

असे असताना आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अतुल भातखळकर यांनी स्टॅम्प पेपर आणि रेशनचे तांदूळ चोरून करोडो रुपये कमवल्याचा आरोपही केला आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1512276063170482182

‘कोण देतंय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’ इति छगन भुजबळ. खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून कराडो रुपये मिळत असतील तर कोण कशाला पोलिसांकडून खंडणी वसूल करेल?, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची पाठराखन केली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी ईडीवरही निशाणा साधला होता.

ज्या वाझेला अटक झाली तो चांदीवाल आयोगासमोर म्हणतो की अनिल देशमुख मला बोलले नाही. याला काय अर्थ आहे. त्यांच्यावर १००, ५००, १००० कोटींचा आरोप करुन ईडीची केस मजबूत करायची आणि जास्तीत जास्त वेळ तुरुंगात ठेवायचं हा ईडीचा प्रकार आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”; भाजपची जहरी टीका
राज ठाकरेंना आशेचा किरण समजत होतो, पण…; पुण्याच्या मनसे उपाध्यक्षांचा राजीनामा
शरद पवारांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहीली प्रतिक्रीया; म्हणाले,…

राज्य ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now