Share

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती लावत ‘या’ खासदाराने जपली ठाकरेनिष्ठा, म्हणाला…

शिवसेनेचे बंडखोर जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात पक्षाच्या ५५ पैकी ४१ आमदारांनी आजपर्यंत हजेरी लावली आहे. त्यानंतर काही खासदारांनीही त्यांना समर्थन दिले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी, आपण पक्ष आणि पक्षप्रमुखांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या ५५ पैकी ४१ आमदारांनी आत्तापर्यंत हजेरी लावली आहे. त्यानंतर काही खासदारांनीही त्यांना समर्थन दिले आहे. त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या १८ पैकी पाच खासदार हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’येथे झालेल्या बैठकीला हजर नव्हते.

असे असताना मात्र पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच शहरातील सर्व शिवसैनिक हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीचे मोठे परिणाम औरंगाबाद, कोकण आणि विदर्भात दिसून आले असले, तरी ते पश्चिम महाराष्ट्रात त्यातही पुणे जिल्ह्यात तेवढे दिसलेले नाहीत. याबाबत बारणे यांना विचारले असता म्हणाले, मी पक्षप्रमुखांच्या बैठकीला हजर होतो. त्यातूनच समजून जा, की मी कुणाबरोबर आहे, अशी उलट विचारणा त्यांनी करत आपण ठाकरेंसोबत असल्याचा संकेत दिला.

दरम्यान, गत टर्मला शहरात तीनपैकी शिवसेनेचे ॲड. गौतम चाबूकस्वार हे एकच आमदार होते. यावेळी ते नाहीत, त्यामुळे मुंबईसह राज्य व देशभरातही शिवसेनेत चाललेल्या मोठ्या घडामोडी व उलथापालथीचे लगेच मोठे परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आलेले नाहीत. त्याबाबत स्वतःहून कुठलाही स्थानिक नेता आपण कुणाच्या बाजूने आहे, हे सांगत नाही. व्यक्त होत नाही, असे सध्या शिवसेनेत चित्र आहे.

पक्षातील बंडाविषयी ॲड. चाबूकस्वार यांना विचारले असता म्हणाले, आमदार गेले म्हणजे शिवसैनिक गेला असे होत नाही. पक्ष संपला असे होत नाही. उलट आता जिद्दीने पेटलो असल्याने पुन्हा उभारी घेऊ, तसेच, पक्ष आणि उद्धव ठाकरेंसोबतच आपण आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now