Share

युक्रेनवर हल्ला करणे पुतीन यांना पडले महागात; झाली ‘या’ अध्यक्षपदावरून हकालपट्टी

रशियाने युक्रेन वरती हल्ला केल्यामुळे त्याचा पडसाद जगातील सर्वच देशावर पडला आहे. जगातील इतर देश रशियाने केलेल्या या हल्ल्याचा विरोध करत आहेत. मात्र रशिया अद्याप आपले पाऊल मागे घेण्यास तयार नसल्यामुळे इतर देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी आता चांगलाच मार्ग शोधला आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनला ज्या पद्धतीने रशिया उध्वस्त करत आहे, त्याचा निषेध जगातील इतर देश करत आहेत. मात्र आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनने पुतिन यांना अध्यक्षपदावरून काढून टाकले आहे.

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना या पदावरून काढल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. एवढेच नाही तर जर्मनीमधील फुटबॉल क्लब शाल्के 04 ने रशियाचा लोगो संघाच्या टी-शर्टवरून हटवत रशियाच्या कृत्यांवर आपला निषेध नोंदवला आहे.

एफसी शाल्के 04 ने क्लबच्या टीशर्टवर असलेला मुख्य प्रायोजक GAZPROM चा लोगो हटवण्याचा निर्णय घेतलाय. GAZPROM ऐवजी आता टी शर्टवर शाल्के 04 असे लिहले जाणार आहे. तसेच दुसरीकडे रशियाच्या फुटबॉल संघाला देखील याचा फटका बसलाय.

आता, पोलंड आणि स्वीडन या दोन संघांनी आगामी फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये पात्रता फेरीत रशियासोबत खेळण्यास नकार दिलाय. पोलंडच्या फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख सेजरी कुलेस्जा यांनी म्हटले की, युक्रेनविरुद्ध रशियाची आक्रमकता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघ रशियाविरुद्ध प्ले ऑफचे सामने खेळणार नाही.

तसेच मॅनचेस्टर युनायडेटने देखील रशियाला दणका दिला आहे. मॅनचेस्टर युनायडेटने रशियाची राष्ट्रीय हवाई कंपनी एअरोफ्लोतची स्पॉन्सरशिप सोडली आहे. क्लबच्या अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनवरील हल्ल्यानंतर एअरोफ्लोतची स्पॉन्सरशीप काढून घेतली आहे.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटनसह, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे आता इतर देशांनी रशिया विरोधात घेतलेली पाऊले पाहून रशिया युक्रेन वर हल्ला करणं थांबवणार का पाहावं लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now