आज दुपारच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचे आता राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे.
आता राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहनिर्मामंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना यावर भाष्य केले आहे. “एका ८२ वर्षांच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, कुणीच आजूबाजूला नसताना हल्ला करणं हा लोकशाहीचा महाराष्ट्रातील पहिला खून आहे, असे आव्हाड म्हणाले.
‘आज पवारांची नात, पत्नी घरात होत्या. दोघीही टीव्ही बघत होत्या. पवार असताना किंवा नसताना पोलीस घराला कधी गराडा घालत नाहीत. कारण त्यांचा जनतेवर प्रचंड विश्वास असतो. मात्र एखाद्याच्या घरावर त्यांची पत्नी, नात घरात असताना तुम्ही असा क्रूर हल्ला करता, हा अतिशय दुर्दैवी असल्याच म्हणत आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली.
आव्हाड म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे वाटले. न्यायव्यवस्थेचा जयजयकार केला. मात्र आज जे काही घडले, कसे घडले, यावर मला बोलायचे नसल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. ‘ज्या महाराष्ट्रात आपण संस्कारक्षम राजकारण बघितले आहे, त्याच ठिकाणी असे होतं असेल तर यापुढील राजकारण कसे असेल हे सांगताच येणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.
‘जेव्हा तुम्ही हे सर्व करता, तेव्हा लक्षात ठेवा तलवाराच्या ताकदीवर जगणारे हे तलवारीनेच मरतात अशी एक म्हण आहे, अशी देखील आठवण आव्हाड यांनी करून दिली. बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलकांशी हात जोडून बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्याचं म्हटलं आहे.
“शरद पवारांची मुलगी यं आदोलकांना सामोरी गेली, त्यांच्या रक्तात पवार यांचेच रक्त आहे, परंतु त्यांनाही धक्काबुक्की करता, हे चुकीचे असून याचा मी धिक्कार करतो,” असेही जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले. घडलेल्या घटनेबाबत आव्हाड यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
महाविद्यालयाने न्यायालयाचा आदेश झुगारला, विद्यार्थीनींना दिली हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी
…तर मग कोणी पण कोणाच्याही घरावर दगडफेक करेल; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
‘पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न’ एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊत संतापले
एका बाऊन्सरमुळे फुटले होते ‘या’ भारतीय फलंदाजाचे डोके, ६० वर्षांनंतर डॉक्टरांनी डोक्यातून काढली मेटल प्लेट