कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. जनजीवन पुन्हा सुरळीतपणे सुरु असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून सिनेमागृह सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असणारे चित्रपटही आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहेत. मागील तीन महिन्यातच अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर आता येणाऱ्या काळात अनेक चित्रपट बॉक्स ऑफिवसर धुमाकूळ करण्यास सज्ज आहेत. तर एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारे बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movies) कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
१. अटॅक
जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंह आणि जॅकलीन फर्नांडिस यांची मुख्य भूमिका असलेला ‘अटॅक’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. यामध्ये एका सैन्यातील अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या शरीरात एक चीप बसविण्यात येते. त्यामुळे ते रोबोटसारखे वागतात. लक्ष्य राज आनंद द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट १ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
२. दसवी
‘दसवी’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका भ्रष्ट मुख्यमंत्र्यांची कथा दाखवण्यात आली आहे ज्यांनी जेलमध्ये राहून दहावी परिक्षा देण्याचे ठरवले होते. तुषार जलोटा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/p/CbKIEPgIR0_/
३. जर्सी
अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर अभिनित ‘जर्सी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट तेलूगू चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात ३६ वर्षाच्या अर्जूनची कथा दाखवण्यात आली आहे जो आपल्या मुलाच्या आनंदासाठी क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
४. हीरोपंती 2
टायगर श्रॉफचा डेब्यू चित्रपट ‘हीरोपंती’चा दुसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये टायगरसोबत कृती सेनन, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अहमद खानद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट एक रोमँटिक-अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. २९ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
५. रनवे ३४
‘रनवे ३४’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, अजय देवगन, रकुल प्रीत सिंह, आकांक्षा सिंह आणि अंगिरा धर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्ट २०१५ साली घडलेल्या घटनांनी प्रेरित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर २९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
एस एस राजामौली यांचे चित्रपट हिट होण्यामागचे खरे कारण आले समोर, वाचून आश्चर्य वाटेल
RRR चा धुमाकूळ! कमाईचा आकडा पाहून सलमान खानही झाला चकीत; म्हणाला..
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली पर्दाफाश करण्याची धमकी, ऐश्यर्या रायचा उल्लेख करत म्हणाली..