बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) दीर्घकाळापासून क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. परंतु, अथिया किंवा राहुलने कधीही त्यांच्या या नात्याची जाहिर कबुली दिली नाही. परंतु, आता या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबूली दिल्याचे पाहायला मिळत आहे.
क्रिकेटर केएल राहुलने सोमवारी आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. राहुलच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर राहुलसोबतचे तीन ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले.
पहिल्या फोटोत ती राहुलला मिठी मारताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अथिया राहुलचे हात पकडून जंगलात फिरताना दिसत आहे. तर शेवटच्या तिसऱ्या फोटोत अथिया आणि राहुल एका बसमध्ये बसलेले दिसून येत आहेत. हे फोटो शेअर करत अथियाने लिहिले की, ‘तुझ्यासोबत कुठेही.. वाढदिवसाच्या शुभेच्छा’.
अथियाच्या या पोस्टवर राहुलने कमेंट करत ‘लव्ह यू’ असे म्हणत तिला प्रतिक्रिया दिली. तर राहुलच्या या कमेंटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. राहुलने आता त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अथियासोबतच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली, अशी चर्चा सुरु आहे. तर त्यांचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, के एल राहुल आणि अथियाने जाहिरपणे त्यांच्या नात्याची कधीही कबुली दिली नाही. परंतु, त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगविण्याचे काम करण्यात दोघेही कोणतीच कसर सोडत नाहीत. दोघे नेहमी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. तसेच एकमेकांच्या फोटोवर प्रतिक्रिया देत असतात. याशिवाय अनेकदा दोघे एकत्र फिरताना दिसून येतात. त्यामुळे दोघांच्या डेटिंगची नेहमीच जोरदात चर्चा सुरु असते.
अथियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तिने ‘हिरो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार आपटला. त्यानंतर तिने ‘मुबारका’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ अशा चित्रपटात काम केले. परंतु, हे दोन्ही चित्रपटसुद्धा फ्लॉप झाले. चित्रपटांमुळे अथिया चर्चेच नसली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी माध्यमात चर्चेत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
लग्नाच्या काही दिवसातच प्रसिद्ध अभिनेत्रीवर रडण्याची वेळ, पोस्ट करत म्हणाली, लवकर ये..
१९ वर्षांच्या ‘या’ मराठमोळ्या पठ्याने एडिट केलीय यशची ३०० कोटींची मेगाबजेट फिल्म ‘KGF 2’