बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के. एल राहुलच्या लग्नाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून माध्यमात सुरु आहेत. असे सांगितले जात आहे की, अथिया आणि राहुल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. यासोबतच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, अथिया आणि राहुल मुंबईत एक आलिशान घर खरेदी करणार आहेत. लग्नापूर्वी ते दोघे त्या घरात लिव्ह-इनमध्ये राहणार आहेत. परंतु, आता या सर्व बातम्यांवर अथियाने आपले मौन सोडले आहे.
नुकतीच एका मुलाखतीदरम्यान बोलताना अथियाने सांगितले की, ती नव्या घरात शिफ्ट होत आहे हे खरं आहे. पण अथिया राहुलसोबत नाही तर तिचे आई-वडिल आणि भावासोबत नव्या घरात शिफ्ट होत आहे. अथियाने म्हटले की, ‘मी दुसऱ्या कोणासोबत नाही तर माझ्या आई-वडिलांसोबत नव्या घरात शिफ्ट होत आहे. मी आणि माझे कुटुंबीय नव्या घरात राहणार आहोत’.
अथिया सध्या तिचे आई-वडिल आणि भावासोबत मुंबईच्या अल्टामाऊंड रोड स्थित घरात राहत आहे. यापूर्वी असे सांगितले जात होते की, अथियाने मुंबईच्या एका पॉश एरियातील बिल्डिंगमध्ये भाड्याने घर घेतलं आहे. या घराचं भाडं महिना १० लाख रूपये आहे. हे घर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या वास्तु या घराजवळ आहे. परंतु, याबाबतही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.
यावेळी अथियाला के. एल. राहुलसोबतच्या लग्नाबाबत विचारले असता तिने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अथियाने म्हटले की, ‘मी यावर काहीही बोलणार नाही. मी या सर्व गोष्टींना कंटाळली आहे. आणि जेव्हा लोक मला असे प्रश्न विचारतात तेव्हा मी फक्त हसते. लोकांना काय विचार करायचं आहे ते करू दे’.
यापूर्वी अथियाच्या लग्नाबाबत अशा बातम्या समोर आल्या होत्या की, अथिया आणि के. एल. राहुल डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नासाछी सुनील शेट्टीने आलिशान हॉटेलपासून ते डिझायनर्सपर्यंत सर्व काही बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मुलीच्या लग्नात कोणतीच कमी राहू नये, असे सुनील शेट्टी इच्छित असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
दरम्यान, अथियाने ‘हिरो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार आपटला. त्यानंतर तिने ‘मुबारका’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ अशा चित्रपटात काम केले. परंतु, हे दोन्ही चित्रपटसुद्धा फ्लॉप झाले. चित्रपटांमुळे अथिया चर्चेच नसली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमी माध्यमात चर्चेत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ
VIDEO: शहनाजने जिंकली चाहत्यांची मनं, ब्रम्हकुमारी सिस्टरसोबत दिसली तेव्हा खिळल्या लोकांच्या नजरा